top of page
Search
Writer's pictureSangeeta Patki

मधुमेह आणि लठ्ठपणा: आहार, व्यायाम आणि तणाव नियंत्रणाच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना

Updated: Oct 8

(Translation: Diabetes and Obesity: Essential Measures of Diet, Exercise, and Stress Management)

आपण सर्व जाणतोच की मधुमेहाने कितीभयंकर स्वरुप धारण केले हेसमोर आले. आपला देशया रोगाची राजधानी ठरेल इतके रौद्रस्वरुप भारतात मधुमेह व लठ्ठपणाने गाठलेआहे. ही शरमेची बाबआहे.

एकअत्यंत खेदजनक बाब म्हणजे केवळआहारात थोडा बदल वनियमित व्यायाम केल्यास हे संकट सहजटाळण्यासारखे आहे. पण त्यासाठीतशी मानसिकता सर्वांना बाळगणे गरजेचे आहे.

भारतमधुमेहाची महासत्ता का होणार याचीकारणे अशी आहेत.


१) आपलेमुख्य अन्न एकदल, द्विदलधान्य आहेत, ज्यात ७०-८०% कर्बोदकेआहेत.

२) शाकाहारीजेवणामधून मुळातच कमी दर्जाचे वकमी प्रमाणात प्रथिने मिळतात.

३) आपणउच्चशिक्षित लोक लठ्ठ पगाराच्यानोकर्या करतो, दिवसाचे १२ तास कामकरतो, जो आपला हातखंडाआहे. पण त्यासाठी आपणआपल्या

आरोग्याची आहुती देतो. तसेच रोजचे २वा अधिक तास प्रवासातजातात. राहिल्या वेळ रोजचे वैयक्तिककारणे, अंघोळ जेवण व कौटुंबिककामात जातो. हे सर्व सांभाळूनझोपेसाठी केवळ सहा तासउरतात. त्यातही कामाचे टारगेट आदि चिंता असतात.


१०-१२ तास घराबाहेरराहिल्याने जे व जसेमिळतील तसे पिष्टमय पदार्थनाईलाजाने खावे लागतात. काहीनाइच्छेविरुध्द ड्रिंक्स सुध्दा घ्यावी लागतात. या सर्व कारणांनीवजन व स्ट्रेस वाढतो. मधुमेहास यामुळेच रेड कारपेटवरून आमंत्रणमिळते.


ज्यालोकांना मधुमेहाची अनुवांशिकता आहे, तसेच ज्यांच्याकामाच्या वेळा दीर्घ वअनियमित आहेत, बि.एम.आय (BMI) २५ पेक्षा जास्तआहे त्यांनी सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. रक्ताच्या चाचणीतएचबी१सी (HbA1c) जर सहा पेक्षाजास्त आली तर मधुमेहजोरात दारं ठोठावंत आहेअसे समजावे. वरील प्रमाणेच ज्यांनायापूर्वीच मधुमेह निदान झाले आहे, एचबीवनसीजास्त आहे अशा लोकांनीतर खूप जागरुक रहावे. या सर्वात चांगली गोष्ट म्हणजे योग्य आहारनियमन व व्यायामाद्वारे तुम्हीआरोग्य नियंत्रणात राखू शकता.


रक्तातीलसाखर अनियंत्रीत(जास्त) राहिल्याने रक्त घट्ट होतेकारण साखर फक्त रक्तातंचसाठू शकते. शरिराच्याइतर स्नायुंमधे ती स्निग्धांशरुपात रहाते. रक्त घट्ट झाल्याने त्याचाप्रवाहीपणा कमी होतो, रक्ताभिसरणातअडचण येते. शरिरातील सूक्ष्म व मोठ्या रक्तवाहिन्यांवरपरिणाम झाल्याने व रक्तपुरवठ्यावर परिणामझाल्याने प्राणवायुही पोचंत नाही. ते अवयंव बाधितहोऊन त्यांच्या कार्यक्षमतेत बिघाड होतो. उदा- डोळ्यांचे आजार- डायबेटीक रेटिनोपंथी, अकाली मोतीबिंदु व काचबिंदु होऊशकतो. मज्जासंस्थेचे आजार होतात. पायालात्रास होतो- डायबेटीक फूट. हे सर्वआजार रक्तातील साखर तसेच कोलॅस्टरोल, व ट्रायग्लिसराईड्स कमी केल्याने टाळतायेतात व या रोगांवरमात करता येते.


अशीवेळ ज्यांच्यावर आली आहे त्यांनीवेळीच गांभीर्य ओळखून गुंतागुंतीच्या आजारावर कशी मात करावी, आहार, व्यायाम व तणावनियंत्रण करूनआपले आरोग्य ठणठणीत कसे राखतां येईलया विषयावरसखोल माहिती मिळेल. यावर मार्गदर्शानासाठी संपर्कसाधावा.


- सौ संगीत पतकी (Sangeeta Patki)

15 views

Comments


bottom of page