top of page
Search
Writer's pictureSangeeta Patki

Eicosanoids - Super Horomones for Good Health

Updated: Apr 30, 2023

आपल्या सर्वांनाच माहित आहे कि आपले आरोग्य आपल्या शरीरातील हार्मोन्सवर अवलंबून असते. हार्मोन्सचा समतोल उत्तम असेल तर उत्तम आरोग्य लाभते. असमतोल असल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.


उदा: इन्सुलिन- रक्तातील साखर नियंत्रित करते, अभाव झाल्यास मधुमेह होतो .थायरॉइस हार्मोन च्या कमतरतेमुळे हायपोथायरॉइडिझम व पुढे गलगंड सारखे आजार होतात. या सारखे अनेक हॉर्मोन्स शरीरात कार्य करीत असतात.


या हार्मोन्सना कोण काबूत ठेवते? त्यांचे स्रवणे कोण नियंत्रित करते? Eicosanoids!!

पण इतर हार्मोन्स सारखे हे ग्रंथीत तयार होत नाहीत.. पेशीमध्ये तयार होतात, रक्तात मिसळून प्रवाहित होत नाहीत तर हे तयार होतात, आपले कार्य करतात व नष्ट होतात. हे सर्व क्षणार्धात घडते. यांची तपासणी करता येत नाही कारण ते रक्तात मिसळत नाहीत.


Eicosanoids ला सुपर हार्मोन्स म्हणतात कारण ते केवळ हार्मोन्स वर नियंत्रण ठेवत नाहीत तर अक्षरश: शरीराच्या प्रत्येक कार्यावर नियंत्रण ठेवतात.उदा: रक्तभिसरण संस्था, प्रतिकारक्षमता, मज्जासंस्था वगैरे.

तुम्हाला जिवंत ठेवण्याचे, तंदुरुस्त ठेवण्याचे काम करतात.त्यांचा प्रभाव प्रत्येक हार्मोन्स च्या निर्मितीवर असतो. चांगले eicosanoids व वाईट eicosanoids असे दोन्ही असतात. आपण त्यांचा समतोल साधला कि झाले..


Balance between good & bad eicosanoids = good health.


Good Eicosanoids काय करतात?

1.रक्तातील गुठळ्या होण्यास प्रतिबंध करतात.रक्ताची गाठ होऊ देत नाही. 2.रक्तवाहिन्या रुंद करतात. ब्लॉकेजेस निर्माण होत नाहीत. 3.वेदना कमी करतात. 4.पेशी विभाजनास अटकाव करतात. अकाली वृद्धत्व टाळतात. 5. रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. 6. मेंदूची कार्यक्षमता वाढवतात.


Bad Eicosanoids काय करतात?

१.रक्त घट्ट करून गुठळी होण्याची परिस्थिती निर्माण करतात. २.रक्त वाहिन्या आकुंचित करतात, अरुंद रक्त वाहिन्यातून रक्त प्रवाहास अडथळे निर्माण होतात. ३.शरीरभर वेदना निर्माण करतात. ४. रोगप्रतिकारशक्ती कमी करतात. ५. मेंदूची कार्यक्षमता कमी करतात.


समजा, वाईट eicosanoids तयारच झाले नाहीत तर किंवा अपुरे तयार झाले तर? कोणत्याही कारणाने होणारा रक्तस्त्राव थांबणारच नाही व अति रक्तस्त्रावामुळे मृत्यू ओढवेल. कारण वाईट eicosanoids मुळे रक्ताची गुठळी होऊन रक्त प्रवाह थांबतो. पण खूप जास्त प्रमाणात वाईट eicosanoids असतील तर नको त्या ठिकाणी रक्ताची गुठळी होऊन हार्ट अटॅक येईल. अशाच प्रकारे उच्चरक्तदाब , कॅन्सर , वेदना, immune disorders यातही घडेल. म्हणून त्यांचा समतोल हवा.


जुनाट दुर्धर आजारांचे कारण eicosanoids मधील असमतोल हेच असते,यामुळे उद्भवणाऱ्या समस्या म्हणजे- उच्चरक्त दाब, stroke , कॅन्सर, खिन्नता ( depression ) वगैरे.


वाईट eicosanoids कमी करण्यासाठी औषधे असतात, परंतु त्यांचे खूप साइड-इफेक्ट्स असतात.. दुसरे म्हणजे हि औषधे चांगले व वाईट यातील भेद ओळखू शकत नाहीत. म्हणून वाईटाबरोबर चांगले eicosanoids पण नष्ट होतात. . Asprin , corticosteroids अशी व अनेक औषधे या प्रकारात मोडतात.. या औषधांमुळे immune system वर विपरीत परिणाम होतो. म्हणून हि औषधे अत्यल्प काळासाठी घेण्याचा सल्ला दिला जातो.

आपला आहार- अन्न हे असे औषध आहे जे कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय या eicosanoids मधील समतोल उत्तमरीत्या राखू शकते.


१. सर्व वाईट eicosanoids ची निर्मिती long chain fatty acid - omega ६ पासून होते.त्याचे नाव aracidonic acid आहे. (A A ) रिफाइंड तेल, डालडा , बाजारातील तळलेले पदार्थ यात असते.

२. चांगल्या eicasanoids साठी EPA -( eicosapentraenoic acid ) omega ३ ची आवक्षकता असते. EPA aracidonic acid ची निर्मिती कमी करतात.

३. हायपर इंसुलीनिमिया ( जादा प्रमाणात इन्सुलिन चा स्त्राव) चा वाईट eicosanoids वर खूप परिणाम होतो.

hyperinsulinemia = high amt of bad eicosanoids . जादा इन्सुलिन मुळे जादा कोलेस्ट्रॉलची निर्मिती होते. परिणामी A A ची निर्मिती जास्त व bad eicosanoids जास्त तयार होतात

म्हणून eicosanoids चा समतोल साधण्यासाठी

१. रक्तातील इन्सुलिन चे प्रमाण कमी करणारा, ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारा,फायबरचे प्रमाण योग्य असणारा आहार घेणे क्रमप्राप्त आहे.

२. ओमेगा ३ व ओमेगा ६ चा उत्तम रेशो असलेले तेल स्वयंपाकासाठी वापरा . WHO च्या शिफारशी प्रमाणे.हा रेशो १:४ ते १:१० पर्यंत असावा. यासाठी घाणीचे शेंगदाणा तेल, जवस चटणी व लोणकढे तूप असा वापर करावा.

३.प्रक्रिया केलेले धान्य, रिफाइंड धान्य मैदा, बेकरीचे पदार्थ टाळावे.

४.जवस चटणी/ मुखवास , बदाम, अक्रोड तीळ, फिश ऑइल टॅब्लेट्स, DHA supplements अशा पदार्थांचा वारंवार वापर करावा.

५. नियमित व्यायाम करावा..

आपल्या आहारात EPA खूप जास्त प्रमाणात कच्चा भाज्या व सॅलेड, मोडाची मेथी, इतर कडधान्ये उत्तम रेशो असलेले तेल/ तूप,


या बरोबरच उच्च दर्जाची प्रथिने असलेले पदार्थ, आणि कमी कर्बोदके असलेला आहार घेऊन eicosanoids चा समतोल साधून जुनाट आजार उदा लठ्ठपणा, उच्चरक्तदाब,संधिवात, हार्ट अटॅक, नैराश्य अशा आजारापासून मुक्ती मिळावी.


-Mrs Sangeeta Patki

Clinical Dietitian




169 views

Commentaires


bottom of page