१ ऑगस्ट पासून स्तनपान सप्ताह साजरा होत आहे.
महाराष्ट्रातील कुपोषण टाळण्यासाठी बाळाच्या आयुष्यातील पहिले ६ महिने अत्यंतमहत्वाचे असतात. व त्यावर त्याचेआरोग्य संपूर्ण आयुष्यभर उत्तम राहू शकते. म्हणूनचया विषयी विशेष मोहीम राबवली जाते.
आदिवासीभागात अजूनही अंधश्रद्धा खूप आहेत. बाळाला सुरवातीचे काही दिवस स्तनपान देत नाहीत. त्या पहिल्या दुधात [Colostrum] असलेल्या अँटीबॉडीज बाळाला मिळत नाही. त्याची रोग प्रतिकार शक्ती सशक्त होत नाही. म्हणून ते वारंवार आजारी पडते व आरोग्यढासळते. शहरी भागात आता याचे महत्व समजले आहे. मार्केट मध्ये तर गाय कॉलेस्टेमच्या गोळ्या देखिल मिळतातं
बाळाच्या आयुष्यात पहिले ५/६ महिने फक्त आणि फक्त स्तनपान हेच महत्वाचे आहे. माते चा आहार यावर खूप प्रभाव टाकतो. दूध येणे हि एक हॉर्मोनल प्रक्रिया आहे. हॉर्मोने ची निर्मिती हि अनेक बाबींवर अवलंबून असते.
मातेचे आरोग्य : अशक्त, अनेमिक माता बाळाचे पूर्णपोषण करू शकत नाही. मातेची विश्रांती देखील महत्वाची असते. दुधाच्या निर्मिती साठी जादI उष्मांक प्रथिने व इतर सर्वपोषक घटक योग्य प्रमाणात असावी लागतात.
मातेची मानसिक अवस्था : खूप जास्त तणाव, दुःख भांडण, वाद, यामुळे हॉर्मोनल बदल होत नाहीत. परिणामी दुध कमी येते.
आहारातील पदार्थ : आहारात एरवीपेक्षा दीडपट सर्व पोषक घटक आवश्यक असतात. यात प्रथिने, कॅल्शियम, लोह या बरोबरच अत्यावश्यक स्निग्धाम्ले ओमेगा-३, भरपूर प्रमाणात असावे. सिगन्धाचा दुधाच्या निर्मितीवर खूपच परिणाम होतो. Fat has definite role in milk production.
पारंपरिक बाळंतिणीच्या खुराक यास शात्रीय आधारआहे. तो लक्षात घेऊन अंगीकारावा. उदा. सुकेखोबरे, बदाम, अक्रोड, चारोळी, तीळ, जवस, कऱ्हाळेया सारख्या तेलबियांमधून, उष्मांक, प्रथिने, ओमेगा-३, कॅल्शियम, लोह, भरपूर प्रमाणात मिळतात.
बाळंतपणात हाडांची झीज होते. त्यासा ठीडिंक उपयोगी पडतो. त्याने बोन मास वाढतो.
हळद व लसूण अँटी बायोटिक गुणधर्मामुळे व्हजायनल हेअल्थ व गर्भाशय नॉर्मलहोण्यासाठी महत्वाचे असतात. हळद अँटीसेप्टिक, अँटिबायोटिक असल्याने हळदीची धुरी जरूर घ्यावी.
जेवणानंतर ओवा, बडीशोप, चुना घालून बनवलेले पान जरूर खावे. ओवा पचन सुलभकरतो. चुना, बडीशोप, बाळंतशोपा कॅलशिम , लोह, व इतरखनिजांसाठी फायद्याचा असतो.
हसरे खेळते निरोगीबाळ राहून त्याची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, वाढीचे सर्व टप्पे योग्यवेळी यशस्वीपणे पार करण्यासाठी, बाळाचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आईने काही गोष्टी कटाक्षाने कराव्या. उदाहरणार्थ बाळाला पाजताना शांतव समाधी समाधानी अंतःकरणाने पाजावे. कुठलाही दुःखद, रागीट विचार मनात आणू नये.
प्रत्येक वेळी अंगावर दूध पाजताना काहीतरी लिक्विड पदार्थ पिऊन मग बाळाला पाजावे. दूध, चहा कॉफी काही नसेल तर निदान पाणी तरी नक्कीच प्यावे.
बाळाला दिवसातून जेव्हा गरज पडेल तेव्हा जितका वेळ बाळ घेईल तेवढे अंगावर पाजावे. बाळाचे पोट भरत आहे किंवा नाही हे समजण्यासाठी बाळ शांत झोपत असेल, त्याची शी व शु योग्यवेळी व्यवस्थित होत असेल तर काहीच काळजी करण्याचे कारण नाही. परंतु दूध प्यायला नंतर बाळ लगेचच उठत असेल किरकिर करतअसेल तर बाळाचे पोट भरले नाही असे समजावे. व त्यावर इलाज करावा.
दूधकमी पडत असेल तरमातेने आहार सुधारावा. बाजरीपेज, नागली पेज, सुके खोबरेघालून केलेला पदार्थ, राजगिरा पीठ व अहळीवखीर अशा पदार्थाने दूध भरपूर येते. दूध भरपूर येईलच आणि बाळाचे पोषण व्यवस्थित होईलच असा आत्मविश्वास बाळगावा. तरीही बाळाची गरज भागात नसेलतर पूरक आहार सुरु करावा.
Comments