top of page
Search
Writer's pictureSangeeta Patki

स्मृतिभ्रंश - Dementia - Alzheimer

स्मृतिभ्रंश / एल्झायमर या विषयी आपण ऐकतोच.आपले वैद्यकीय शास्त्र कितीही प्रगत असले तरी काही आजारांवर अजूनही पूर्णपणे इलाज सापडलेला नाही.हेआजार वया बरोबर वाढत जाणारे असतात. या आजारांना वेळीच ओळखणे व ठेवता येईल तेवढे काबूत ठेवणेच आपल्या हातात असते. अशा आजारांपैकी स्मृतिभ्रंश व पुढे एल्झायमर !


तुमचे वय ६० किंवा जास्त आहे का ? तुमच्या कुटुंबात जेष्ठ व्यक्ती आहेत का ?

होय असेल तर हा लेख काळजीपूर्वक वाचावा अशी विनंती आहे

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर स्मृत्युभ्रंश म्हणजे " विस्मरण "

आपण बरेच वेळा म्हणतो / ऐकतो ८८ वर्षाचे आहेत पण अजूनही वाचा खणखणीत, स्मृती उत्तम, सगळे छान आठवते व स्वावलंबी आहेत.उतारवयात वयक्तिक नित्यकर्मकारण्यास कोणाची मदत न लागणे - अहो परमभाग्य.!

नेमके काय म्हणजे स्मृतिभ्रंश ते बघूया.

मेंदूमध्ये असणाऱ्या विशिष्ठ पेशी= neurons = चेतापेशी ज्या सर्व शरीराकडून मेंदूकडे व मेंदू कडून सर्व शरीराकडे संवेदना पोहचविण्याचे काम करतात. तरुणपणी या पेशी नष्ट झाल्याकी पुन्हा तयार होतात . परंतु वाढत्या वयाबरोबर या नष्ट च होत जातात.

जशी शरीराची झीज भरून काढण्यासाठी पोषकतत्वे आवश्यक असतात तसेच या चेता पेशींच्या आरोग्य साठी विशिष्ट पोषकतत्वांची गरज असते .

सुरवातीला स्मृतिभ्रंश झाला कि विचार करणे, स्वतः चे नाव, आज काय तारीख आहे, पत्ता अशा गोष्टींचे विस्मरण होते.

पुढे हळू हळू दैनंदिन रुटीन करणे जमत नाही. याची सुरवातीची लक्षणे म्हणजे :-

१. बोलतांना शब्द आठवत नाही,

२. आकलन शक्ती कमी होते. चटकन समजत नाही,

३. स्मरणशक्ती कमी होते, फार जुने आठवते, वर्तमान आठवत नाही.

४. भावनांवर कंट्रोल राहत नाही.

५ . व्यक्तित्व व मनःस्थितीत बदल होतो

६. उदासीनता व निरुत्साह वाढतो.

ऍडव्हान्स स्टेज मध्ये चलबिचल वाढते.

८. हालचालींमध्ये गोंधळ होतो.

९. एकाच वेळी बोलणे व हालचाल करू शकत नाही . गोंधळलेले असतात .

१० गिळताना त्रास होतो. तोंडात घेतलेला घास चावायचे लक्षात राहत नाही किंवा समजत नाही

११. स्नायूंना पेटके येतात

स्मृतिभ्रश च्या ऍडव्हान्स स्टेज ला एल्झायमर म्हणतात. स्मृतिभ्रंश कोणाला होतो ?

१. बरेच वेळा अनुवंशिकता आढळते. परंतु १००% रुग्णांमध्ये अनुवंशिकता आढळतेच असे नाही.

२. थायामीन या बी वर्गीय जीवनसत्वाची वर्षांनुवर्षे कमतरता असणे

३. जीवनसत्व बी -१२ ची दीर्घकाळ कमतरता किंवा पातळी कमी

४.ओमेगा ३ या essential fatty acid ची लहानपणापासून कमी

५. वर्षानुवर्षे आहारात प्रथिनांचा अभाव

६. एकटेपणा

७. कुटुंबाला आपली गरज नाही अशी भावना/ कुटुंबात सुसंवाद नसणे.

८. आयुष्याचा लेखाझोखा व नैराश्य.

९. एकटपणा , मनमोकळे बोलायला कोणी नसणे

१०. अयोग्य जीवनशैली .

यापैकी एक किंवा अनेक कारणामुळे व्यक्ती अशा आजारांना बळी पडतात.

एकदा आजाराचे निदान झाले कि रुग्णाची व त्याच्या कुटुंबीयांची दयनीय/ असहाय्य अवस्था होते. आजाराची तीव्रता कमी असेल व लवकर निदान झाले तर औषधांचा व supplements चा थोडा फायदा होतो. हा आजार progressive असल्याने वाढतच जातो. या आजाराला प्रतिबंध कसा करावा?

 पुण्या मुंबईत या विषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम चालू आहेच. बरीच मंडळी यावर अभ्यास करीत आहेत. तरीही काही गोष्टी कटाक्षाने कराव्या..

१. ५० वर्षे वयानंतर नियमित रक्ताच्या चाचण्या कराव्या. त्यात Hb , सिरम बी १२, उपाशी पोटीं व जेवणानंतरची शुगर,HbA1c , व इतर यांचा समावेश असावा.

२. वजन व मधुमेह नियंत्रणात ठेवावे.

३. समतोल आहार घ्यावा.

४. निवृत्ती नंतर मेंदूला चालना देण्यासाठी काही तरी शिकत राहावे. मग ते एखादे स्तोत्र असेल

५. मनमोकळे बोलावे.

६. हास्य क्लब, मेमरी ग्रुप असे मेंदूला चालना देणारे ग्रुप जॉईन करावे व त्यावर ऍक्टिव्ह रहावे.

७. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवावे.


एवढेच आपल्या हातात असते .


78 views

Comentários


bottom of page