Take a break for your own sake: mind your mental health!
आपल्याला भेडसावणारे आरोग्याचे प्रश्न हे बहुतांशी असंसर्गीय असतात.( मी कोरोना बद्दल बोलत नाहीये.)
म्हणजे बघा ऍसिडिटी, वारंवार डोके दुखणे, मायग्रेन, अपुरी झोप,सकाळी उठल्यावर फ्रेश नसणे, आळस , कंटाळा, वजन वाढणे, high Bp अश्या अनेक व्याधी संसर्गामुळे होत नाहीत. यावर वेळीच इलाज केला नाही तर याचे रूपांतर मोठ्या आजारात होऊ शकते. हल्लीच एक पुस्तक वाचले "माईंड अँड गट कनेक्शन".
उत्तम आरोग्याची व्याख्या करायची झाली तर : PHYSICAL, MENTAL, SOCIAL AND SPIRUTUAL well being is good health. अशी करता येईल यात मेंटल हेल्थ म्हणजे काय?
तर तणाव रहित अवस्था. कारण तणावाचा आरोग्यावर खूपच प्रभाव असतो.
आजकाल तणावाबद्दल एवढे का बोलले जाते? चांगल्या आरोग्यासाठी व आयुष्यासाठी काही प्रमाणात तणाव आवश्यक आहे. पण तो जास्त होता कामा नये.
आपल्या पूर्वजांना तणाव नव्हता का?
होता न!! पण त्यावेळी शारीरिक तणाव जास्त व मानसिक तणाव कमी होता. आता फक्त मानसिक तणाव असतो व तो दीर्घ काळ टिकतो. ही गोष्ट आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
जेव्हा आपण तणावग्रस्त असतो त्या वेळी तणावाला तोंड देण्यासाठी शरीरातून काही केमिकल्स निर्माण होतात, त्याला हार्मोन्स म्हणतात. उदा कॉर्टिसॉल , ऍड्रिनॅलीन वगैरे. हे हार्मोन्स रक्तात मिसळले कि हृदयाकडून अधिक रक्त पम्प होऊन शरीरभर मिसळते, रक्ताची गुठळी होण्याची क्रिया सक्रिय होते,हातापायाचे स्नायू ताठ होतात. तणावाची परिथिती गेली कि हे हार्मोन्स स्रवणे थांबते व आपण नॉर्मल होतो.
पण जेव्हा मानसिक तणाव असतो तेव्हा तो दीर्घकाळ राहत असल्याने हे हार्मोन्स दीर्घ काळ रक्तात साचतात. त्यांचा परिणाम आरोग्यावर होतो.
शास्त्रज्ञांनी असा सिद्धांत मांडला आहे कि , तणावामुळे मेंदूच्या संवेदनशील भागात काही बदल होतात व त्याचा परिणाम म्हणून आपण संवेदनक्षम होतो, आतड्यातील ऍसिड ची पातळी वाढते,या बरोबरच ऍसिडची पातळी नियंत्रण करणारे घटक prostaglandins ची निर्मिती कमी होते, म्हणून तणाव असताना acidity हे लक्षण प्रथम दिसते.
आपल्याला होणारे ९०% आजार हे मनोकाईक असतात असे म्हणतात.म्हणजेच आपल्या मानसिक अवस्थेचा आपल्या शारीरिक अवस्थेवर परिणाम होतो. ह्याला शात्रीय आधार आहे हे लक्षात येते.आपण म्हणतो "एखाद्याचे पित्त खवळले आहे" म्हणजे त्याला राग आला आहे असा अर्थ होतो. "तिला बघितले कि डोक्यात तिडिक जाते" असेही म्हणतो. एखाद्या व्यक्तीला बघून किंवा प्रसंग घडला कि पित्त खवळणे यास मागील आठवणींचा संबंध जोडला जाणे , कारणीभूत असते. (past memories.) आपल्या विचारांचा परिणाम यकृतावर होत असतो. यकृत ५०० पेक्षा जास्त रसायने(chemicals ) तयार करीत असतो. यात जेवढ्या नकारात्मक आठवणी,गोष्टी आपण साठवून ठेऊ तेवढे सर्व रस्ते आपण ब्लॉक करतो. मग कालांतराने प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम दिसायला लागतो.
आपल्याला तणाव आहे हे जाणून घ्या व तणाव नियंत्रणाचे नैसर्गिक मार्ग शोधून त्या प्रमाणे वागा.
यासाठी आपण काय करू शकतो.?
१) व्यायाम. व्यायामाने ताठर झालेले स्नायू शिथिल होतात. व्यायामाने हैप्पी हार्मोन्स स्त्रवतात. उदा सिरोटोनिन, एन्डोरफीन . एन्डोरफीन हा नैसर्गिक वेदनाशामक आहे. व्यायामाने वजन आटोक्यात राहते. व पोटावरचे प्रेशर कमी होते.
२) ज्या पदार्थाने त्रास होतो ते पदार्थ खाणे टाळा.
तणाव असल्याने छातीत जळ जळ होणे, घशाशी अन्न येणे अशी लक्षणे असतात. मसाल्याचे पदार्थ, चॉकलेट. फळांचा रस , तंबाखू , टोमॅटो खाल्ल्याने लक्षणे वाढतात.
३) पुरेशी झोप घ्या. शांत झोप हा तणाव घालवण्याचा नैसर्गिक उपाय आहे.
4) विरंगुळा. मनोरंजन, विश्रांती यांचे शास्त्र समजून घ्या व आचरणात आणा. यासाठी मेडिटेशन, योग, प्राणायाम याचा खूप फायदा होतो.
रामदास स्वामी म्हणतात "मना त्याचि रे पूर्व संचित केले ,तया सारिखे भोगणे प्राप्त झाले" म्हणून पित्त खवळू द्यायचे नाही. राग गिळायला शिका. प्रगती होईल.
Mrs Sangeeta Patki
Revival Health, Nashik
Comments