top of page
Search
Writer's pictureSangeeta Patki

दिवाळी साजरी करा, आरोग्य जपा: तळणाचे तेल पुन्हा वापरण्याचे धोके

Updated: Nov 1

या दिवाळीत आरोग्याच्या प्रकाशाने तुमचे जीवन उजळू दे . सणाचा आनंद घेतांना पोषणमुल्यांचे महत्त्व लक्षात घ्या . मिठाई व तळलेल्या पदार्थांचा आस्वाद मर्यादेत ठेवून ताज्या व आरोग्यदाई अन्नावर भर द्या.


तेल - तळणाचे - पुनः वापरावे का?


दिवाळीत फराळाचे पदार्थ व सणाचा विशेष मेन्यू यात तळलेले जिन्नस असतातच . बरेच वेळा एकदा वापरलेले तेल पुनः वापरले जाते . त्याचे काय धोके आहेत हे जाणून घेऊ .


१ . तेल गरम केल्यावर त्याचे विघटन होऊन त्यात “ ट्रांस फॅट्स “निर्माण होतात. म्हणून त्याचा रंग व घनता बदलते. हे “ट्रांस फैट “ आरोग्यासाठी अत्यन्त घातक असतात . व त्यामुळे हृदयरोग, मधुमेह व इतर आजारांचा धोका वाढतो .


२. तेल गरम केल्यावर त्यात “फ्री रॅडिकल्स” तयार होतात. ज्या शरीरात फ्री रॅडिकल्स जास्त त शरीरास आरोग्याचा धोका जास्त .


३. ⁠तेल गरम केल्याने त्यातील “ अँटीऑक्सीडॅंट” नष्ट होतात . आरोग्य उत्तम राखण्यासाठी ते आवश्यक असतात .

४. ⁠पुनः पुनः तेच तेल वापरल्याने तेलाची चव बदलते. ५. ⁠पुनः तेच तेल वापरल्याने कॅन्सर चा धोका वाढतो .


म्हणून एकदा वापरलेले तेल पुनः वापरू नका . बाजारात मिळणारे किंवा हॉटेलमधील तळलेले पदार्थ टाळा .



(English translation)


Let the light of health brighten your life this Diwali. While enjoying the festival, remember the importance of nutrition. Savor sweets and fried snacks in moderation, and focus on fresh, healthy foods.


Should you reuse oil for frying?

During Diwali, snacks and festive dishes often include fried items. Many times, used oil is reused, which can have serious risks. Let’s understand why:

  1. Formation of Trans Fats: When oil is heated, it breaks down and forms "trans fats." These are harmful to health and increase the risk of heart disease, diabetes, and other illnesses.

  2. Free Radicals: Heating oil creates "free radicals," which, when excessive in the body, can pose health risks.

  3. Loss of Antioxidants: Antioxidants in the oil are destroyed when it is repeatedly heated. Antioxidants are essential for maintaining good health.

  4. Changes in Taste: Reusing oil changes its taste, affecting the flavor of food.

  5. Increased Cancer Risk: Repeatedly using the same oil raises the risk of cancer.

So, avoid reusing oil after frying once. Try to limit or avoid fried foods from the market or restaurants as they may use reused oil.


-Mrs Sangeeta Patki Dietitian (Registered)

2 views

Comments


bottom of page