top of page
Search

आला उन्हाळा तब्बेत सांभाळ!

Writer: Sangeeta Patki Sangeeta Patki

दोन दिवसापासून गर्मी खूपच वाढली आहे . (Heat Wave) हिटवेव येण्याची शक्यता वर्तवली आहे.

गर्मी मुळे ऊन लागणे, डोके दुखणे, मायग्रेन असे वारंवार होते व आपण हैराण होतो.

यासाठी काही घरगुती उपाय करून पाहा . खूप फायदा होतो.

१. शक्यतो उन्हात जाणे टाळा. उन्हाने गरम झालेल्या गाडीत बसणे टाळा.

२. भरपूर पाणी प्या.

३. ⁠कैरी, कोकम सरबत, लिंबुपाणी, पुदिना, कांदा आणि कलिंगड, खरबूज , मोसंबी, अशी फळे भरपूर खा.

४. अपचन होणार नाही व पोट साफ राहील याची दक्षता घ्या .

५. उन्हाने डोके दुखत असेल , मायग्रेन झाले असेल तर अर्धा मीडियम साईज कांदा किसून रूमालात घेऊन २/३ थेंब कानात पिळा व ५ मिनिटे तसेच झोपा. ५ मिनिटाने तळहातावर कांद्याचा रस काढून टाका . गरम रस हातावर येईल . असेच दुसऱ्या कानात टाका . १० मिनिटात बरे वाटेल . कांदारस मस्तकातील उष्णाता शोषून घेतो . तळपाय व तळहातला किसलेला कांदा चोळा. बरे वाटल्यावर गार पाण्याने अंघोळ करा.

करुन बघा. 


हमखास उपाय आहे.


 
 

Comments


bottom of page